नमो शेतकरी महासन्मान निधी योजना |आता मिळतील 12 हजार रुपये Namo Shetkari Yojana

नमस्कार जय महाराष्ट्र मित्रानो

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना :Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

आपल्या देशात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांची अवस्था पाहता वेगवेगळ्या योजना राबवत असते ,अशीच शेतकऱ्यांच्या हिताची योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शासन देशात राबवत आहे.

आपल्या देशात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्रसरकार कडून  शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. चार महिन्यात प्रत्येकी दोन हजार रुपये ,शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी प्रणाली द्वारे जमा केली जाते.

केंद्रसरकारपाठोपाठ राज्य सरकार. ने हि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojanaआणली आहे, या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्रमाणे चार महिन्याच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार मिळणार अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना जाहीर केले. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ राज्यातील कोणत्या शेतकर्यांना मिळणार याचीच माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.


नमो शेतकरी महासन्मान निधी
नमो शेतकरी महासन्मान निधी

राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहेत ?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ राज्यातील एक कोटी पंधरा लाख शेतकरी कुटुंबाला होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल ते पाहावं लागणार आहे.'Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana' 

देशाचा विचार केल्यास भरपूर दिवसापासून  या योजनेतील लाभार्थ्यांनी संख्या कमी झाली आहे. 11 कोटींहून ती साडे आठ कोटींवर आली आहे. ITR भरणाऱ्याना व सरकारी नोकरदारांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल ?

  • सर्वप्रथम शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक करून घायचे आहे तरच पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील
  • शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जि तुम्हाला PM किसान च्या वेबसाईट वर किंवा CSC केंद्रावर जाऊन स्वतः करावी लागेल.
  • शेतकऱ्यांनी ७/१२ वरील नाव आणि आधार कार्ड वरील नावात तफावत असेल तर ती दुरुस्त करून घ्यावी.
  • शेतकर्यांनी जमिनीचा तपशील बरोबर त्याच गावच्या शिवारात PM किसान योजनेत नोंद केलेला आहे का याची खात्री करावी.


योजना कधीपासून व कशी लागू होणार?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला. या योजनेच्या कार्यपद्धतीनुसार, पुढचा हप्ता मे ते जुलै 2023 दरम्यान जारी केला जाईल.


PM- किसान योजनेची ऑनलाइन ई-केवायसी (eKYC) ची प्रक्रिया OTP द्वारे कशी करायची.

  • PM किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
  • वेबसाइटच्या उजव्या बाजूस असलेल्या eKYC च्या पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर सर्च करा.
  • आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल क्रमांकावर OTP जाईल.
  • खाली दिलेल्या  बॉक्समध्ये मोबाईलवर मिळालेला ओटीपी क्रमांक टाका आणि सबमिट करा
  • यांनतर तुमचे eKYC अपडेट केले जाईल.


PM- किसान योजनेची ऑनलाइन ई-केवायसी (eKYC) ची प्रक्रिया  बायोमेट्रिक द्वारे कशी करायची ?

  •  तुमच्या जवळच्या CSC केंद्राला  भेट द्या.
  • पीएम किसान खाते अपडेट करण्यासाठी आधार कार्ड द्यावे लागेल.
  • खात्यात लॉग इन करण्यासाठी बायोमेट्रिक म्हणजेच तुमचे बोट समोर असलेल्या स्कॅनर वर ठेवावे लागेल.
  • आधार कार्ड क्रमांक टाकून  फॉर्म सबमिट कराव लागेल.
  • यानंतर, केवायसी अपडेटची OTP मोबाइलवर येईल आणि अशा प्रकारे ऑफलाइन केवायसी अपडेट होईल.







Post a Comment

0 Comments