शेतातून विजेची लाईन किंवा डीपी टॉवर उभारल्यास किती मिळतो मोबदला ?

 नमस्कार जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो 

शेतातून विजेची लाईन किंवा डीपी टॉवर उभारल्यास किती मिळतो मोबदला ?

शेतातून विजेची लाईन किंवा डीपी टॉवर उभारल्यास किती मिळतो
शेतातून विजेची लाईन किंवा डीपी टॉवर उभारल्यास किती मिळतो


 आपल्या शेतामधून विजेचे पोल किंवा डीपी असल्यास शेतकऱ्याला त्याचे भाडे किंवा मोबदला मिळतो का?

 तर मित्रांनो खूप दिवसापासून व्हाट्सअप द्वारे एक मेसेज फिरत आहे की शेतामधून विजेची लाईन विजेचे पोल किंवा डीपी असल्यास शेतकऱ्याला त्याचा मोबदला आणि भाडे मिळते  याचाच आम्ही शोध घेतला आणि  काही चौकशी केली असता आम्हाला काही गोष्टी समजून आल्या तर विज कायद्याच्या नियम ,अटी काय आहेत ते बघूया.


 व्हायरल मेसेज मध्ये असं सांगण्यात आलं होतं की शेतात डीपी असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये महिन्याला मिळतात शिवाय हा मोबदला वीज कायदा 2003 च्या कलम 57 अंतर्गत देण्यात येतो असंहीसांगण्यात आले. आम्ही या व्हायरल मॅप मेसेज मागचं सत्य सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तर  सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मेसेज चुकीचा आहे अस समजल, शेतात  डीपी असेल तर प्रति महिना पाच हजार रुपये मिळतात हा मेसेज शंभर टक्के फेक आहे . 

शेतातून विजेची लाईन किंवा डीपी टॉवर उभारल्यास किती मिळतो

      2003 मध्ये देशात वीज कायदा आला आणि 2005 मध्ये त्यात काही रेगुलेशन आलेत त्यात शेतातून लाईन तसेच ट्रान्सफॉर्मर असेल तर कंपनीने संबंधित शेतकऱ्याला जमिनीचा भाड द्याव अशी तरतूद होती पण त्याकाळी राज्यातल्या एकाही शेतकऱ्यांनी या तरतुदी खाली मोबदल्यासाठी अर्ज केला नाही आणि पुढे चालून ही तरतूद शासनाने रद्द केली त्यामुळे शेतातील पोल किंवा डीपी च्या मोबदल्या शेतकऱ्याला भाडं मिळतं अशी कुठलीही तरतूद नाही

  महाराष्ट्रात महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी आणि इतर खाजगी शेतातून विजेची लाईन पारेषण कंपन्या लाईनचे तार टाकतात आणि एका एका जागेवरून दुसऱ्या जागेवर लाईन नेण्यासाठी ते अत्यंत गरजेचं असतं त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टावर उभारले जातात .

महाराष्ट्र सरकारने  2010 साली शासन निर्णय काढला आणि त्यानंतर 66 ते 765 केवी क्षमतेच्या लाईट साठी टावर उभारले आणि त्यासाठीच्या संदर्भात काही आदेश जारी केले तर मित्रांनो आपल्याला हा मोबदला कसा मिळतो कशा पद्धतीने मिळतो ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 खालील लिंक वर जाऊन जीआर डाऊनलोड करा.


शेतातून विजेची लाईन किंवा डीपी टॉवर उभारल्यास किती मिळतो
शेतातून विजेची लाईन किंवा डीपी टॉवर उभारल्यास किती मिळतो


काय म्हणतो शासन निर्णय ?

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषन कंपनी मर्यादित महापारेषेन च्या कार्यक्षेत्रात 66 के .व्ही. ते 765 के.व्ही च्या पारेषण वाहिन्यांचे उभारणी आणि अस्तित्वात असलेल्या वाहिन्यांची देखरेख दुरुस्ती नूतनीकरण ही कामे नेहमी होत असतात .

बऱ्याच वेळा पारेषण वाहण्याची उभारणी व अस्तित्वात असलेल्या वाहिन्यांचे नूतनीकरण,देखरेख, दुरुस्तीची कामे करीत असताना निरनिराळ्या या प्रकारचे अडथळे जमीन धारक किंवा शेतकरी त्यांच्याकडून विरोध होत असतो महापारेषण कंपनीतर्फे विद्युत वाहण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्यामुळे व्यापलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती 

 महाराष्ट्र राज्य विद्युत पारशन कंपनी मर्यादित यांच्याकडून महापारेषण कंपनीतर्फे विद्युत वाहिन्यांच्या उभारणीसाठी मनोर यांनी व्यापलेल्या क्षण जमिनीची क्षतिपूर्ती मोबदला प्रस्तुतची व्यापलेली जमीन अधिग्रहित न करता जमिनीच्या खालील तपशीला नमूद केलेल्या वर्गीकरणाच्या आधारे व संबंधित भागातील वार्षिक बाजार मूल्य दर तक्त्याप्रमाणे असलेल्या जमिनीच्या दारांच्या आधारे क्षतिपूर्ती मोबदला देण्यात यावा.

जमिनीचा मोबदला हा जमिनीच्या प्रकारानुसार देण्यात येतो तर तो आता आपण पाहूया .

"शेतातून विजेची लाईन किंवा डीपी टॉवर उभारल्यास किती मिळतो मोबदला"

  1. जमीन जर गैरसिंचना खालील (कोरडवाहू ) असेल तर जमिनीचा मोबदला हा 25% टक्के देण्यात येतो.
  2. जमीन सिंचना खालील कृषी जमीन (ओलीत  ) असेल तर जमिनीचा मोबदला 50% देण्यात येतो .
  3. बागायती फळबागाची कृषी जमीन असल्यास 60 टक्के एवढा मोबदला देण्यात येतो .
  4. गैर कृषी जमीन ( शहरी जमीन )शहरी विभागातील जमिनीस 65 टक्के एवढा मोबदला देण्यात येतो.

वरीलपैकी क्रमांक 1 व 2 मधील जमिनीचा मोबदला ठरविण्याची अधिकार संबंधित विभागीय उपजिल्हाअधिकारी यांना तसेच क्रमांक 3 व 4 मधील जमिनीसंबंधी मोबदला ठरविण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले असतात. सदरचे मूल्यांकन मंजुरीची प्रकरणे त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय समिती मार्फत 30 दिवसात निकली करण्यात यावेत.

* सदरील शासन निर्णय खाजगी कंपनी तसेच पावर ग्रीड कॉर्पोरेशन यांना त्यांचे मनोरे उभारण्यासाठी व्यापलेल्या जमिनीच्या प्रकरणीही लागू राहील.

तर आता अर्ज कुठे करायचा ?

* अर्ज करण्यासाठी महापारेषणच्या स्थानिक कार्यालयात मोबदल्या संदर्भात तुम्ही अर्ज करू शकता.









Post a Comment

0 Comments