बालसंगोपन योजना अंतर्गत मिळणार २२५० रुपये महिन्याला लगेच लाभ | Balsangopan Yojana Maharashtra



Balsangopan Yojana :आजकाल प्रत्येकजण जीवनात आपल्या कुटूबियांसोबत जगतो पण काही मुलांच्या नशिबी सुख हरवलेल असत, काय होईल सांगता येत नाही.मागच्या काळात प्लेग तसेच २०२०-२१ मध्ये कोरोना अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला,

कोरोना काळामध्ये अनेक जणांनी आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत,मग कुणाचा भाऊ असेल वडील आई बहिण असेल तो काळ कसा होता हे सांगायची गरज नाही. त्यानंतर शासनाने मृत्यू पावलेल्या लोकांना ५० हजाराची मदत जाहीर केली होती ती मिळालीही या मदतीने माणूस परत येणार नाही किंवा कोणी अनाथ झाले त्यांचे आईवडील हि मिळणार नाहीत .

अशाच एका अनाथ योजनेच्या माध्यमातून शासन ज्यांचे आई वडील म्र्त्यू पावले आहेत आणि मुले अनाथ झाली आहे अशा मुलांसाठी शासन ( Balsangopan Yojana)बाल संगोपन योजना आपल्या राज्यात राबवत आहे तर काय आहे हि योजना कोण कोण यात लाभ घेऊ शकतो ते आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत

 
Balsangopan-Yojana
  


काय आहे बालसंगोपन योजना ?  Balsangopan Yojana


बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते.या योजने अंतर्गत आत्तापर्यंत ११०० रुपये मिळत होते .पण शासनाने यात बदल करून एक एप्रिल पासून या योजनेत २२५० रू मिळणार आहेत. या योजनेचा लाभ आपल्या जवळील कोणी अनाथ मुले यांना देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्यांचे भविष्य उज्वल होऊन ते एका चांगल्या मार्गाने जाऊन स्वतःचे भविष्य घडवतील.

आजकाल अशे भरपूर मुले तुम्हाला मिळतील ज्यांची परिस्थिती त्यांचे पालक गेल्यानंतर हलाकीची आहे. अशा मुलांनी शेक्षणिक सामाजिक,अज्ञानी राहू नये आणि त्यांचा आर्थिक सामाजिक शेक्षणिक दर्जा वाढावा यासाठी शासन पुरेपूर प्रयत्न करत असते.अशाच दुर्लभ घटकासाठी हि योजना शासनाने २००८ रोजी अमलात आणली आहे आणि काही दिवसापुरी त्यात काही फेरबदल केले तर चला जाणून घेऊया.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे गृह भेटी देण्यासाठी व इतर सनियंत्रण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व परीविक्षा अधिकारी नसताना सुध्दा त्यांच्यामार्फत तसरळ हजारो बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. मोठ्या संख्येने दोन्ही पालक असलेल्या मुलानाही सदरयोजनेचा लाभ वर्षानुवर्षे त्याचा review न करता देण्यात येत आहे. म्हणून या योजनेत फेरबद्दल झाले.Balsangopan Yojana


बालसंगोपन योजनेचा( Balsangopan Yojana ) फायदा कोणाला घेता येईल?


⛯अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक देणे शक्य होत नाही, अशी बालके .

⛯एक पालक असलेली family Crisis मध्ये असलेली बालके

⛯काही कारणास्तव मुलांचे पालक मृत्यू पावले असतील अशी बालके

⛯घटस्पोट झालेल्या पालकांची बालके

⛯अविवाहित मातृत्व असलेल्या पालकांची बालके

⛯गंभीर आजारामुळे रुग्णालयात भारती असलेल्या पालकांची बालके

⛯कुष्ठरोग ग्रस्त असलेल्या पालकांची मुले

⛯जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके

⛯HIV एड्स झालेला आहे अशी बालके

⛯दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके

⛯पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव असलेला ची बालके

⛯न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्स्थतीतील (Crisis situation मधील) बालके .
⛯शिक्षा तुरुंगवास झालेले पालक यांची मुले यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळू शकेल

⛯शाळेत न जाणारे बाल कामगार कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले बालक

⛯तीव्र मतीमंद Multiple disability बालके

⛯ज्या मुलांच्या आई-वडीलांना HIV झालेला आहे अशी मुले

⛯कॅन्सर ग्रस्त पालकांचे मुले यामध्ये पात्र असतील.

⛯अशा परिवारातील मुले ज्या परिवारात पालकांपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसरा पालक कमावता नाही, अशा परिस्थितीत त्या मुलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात येतो.




(Balsangopan Yojana )बालसंगोपन योजनेच्या अटी :


🔆हि योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलांसाठी आहे

🔆योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे वय १८ वर्षाखालील असावे.

🔆सरकार-मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी गरजू मुलांची निवड करून बालकल्याण समितीसमोर मुलांना सादर करणे आवश्यक आहे. बालकल्याण समितीच्या मान्यतेशिवाय बाल संगोपन योजनेंतर्गत त्या बालकांना कोणतेही अनुदान दिले जाणार नाही.

🔆या योजनेसाठी निवड झालेल्या कुटुंबा च्या नावाने. बँकेत किंवा पोस्ट कार्यालयात खाते उघडावे लागेल.

🔆दोन अपत्य असल्यास दोघांचे स्वतंत्र अर्ज करावे लागतील.


(Balsangopan Yojana ) बालसंगोपन योजनेसाठी अर्ज कुठे करावयास लागतो. ?


या योजनेसाठी अर्ज हा पूर्ण भरून तालुका स्तरावर महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समिती समोर सोबत मुलांना नेऊन फॉर्म जमा करावा. बालकल्याण समिती कार्यालय सोबत ज्यांचा फॉर्म भरला आहे त्या मुलांना सोबत नेणे सक्तीचे आहे.



या अर्जाला कोणती कागदपत्र जोडणे आवश्यक आहे ?


याचा अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून घ्यायचा आहे
पालकाचे व बालकाचे आधारकार्ड प्रत
मुलांचे शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
तहसीलदार यांचा उत्पन्न प्रमाणपत्र
पालकांचे मृत्यू असल्यास मृत्युच प्रमाणपत्र
पालकाचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा)
मुलांचे बॅक खातेपुस्तक प्रत व ते नसल्यास पालकांचे खातेपुस्तक
मृत्यूचा अहवाल - ( कोविडने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल)
रेशनकार्ड प्रत .
घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा रंगीत फोटो ( दोन मुले असल्यास दोन्ही मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो )
मुलांचे ३ पासपोर्ट फोटो

या योजनेमार्फत जास्तीत जास्त गरजूंना लाभ देण्याचा प्रयत्न करावा.










बालसंगोपन योजना काय  आहे ?

बालसंगोपन योजना महाराष्ट्र राज्यासाठी 

अनाथ मुलांसाठी योजना


Post a Comment

0 Comments