Gharkul Yojana 2023 : प्रधानमंत्री आवास योजना यादी आली

नमस्कार जय महाराष्ट्र मित्रानो

Gharkul Yojana :प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.

ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा घरकुल योजनेचा उद्देश आहे.आजच्या लेखात आपण घरकुल योजनेची यादी कशी बघायची ते बघणार आहोत

लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.



(Gharkul Yojana )घरकुल योजनेच्या अटी :

Gharkul Yojana घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत.

वरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

सन 2002 मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्व्हेनुसार सन 2007-08 ते सन 2014-15 मध्ये लाभार्थ्यांची निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे.

सन 2011 च्या आर्थिक सामाजिक व जात सर्वेक्षणाची माहितीच्या आधारे सन 2015-16 पासून पुढील वर्षांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.gharkul yojana maharashtra

Gharkul Yojana


प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजने अंतर्गत किती लाभ देण्यात येतो ?


लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रू.95,000/- इतके अर्थसहाय दिले जाते.

घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.

स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.

सन 2016-17 पासून प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाणार आहे.

घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येते.

प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँकखात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा होत असते.

प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येते.




Gharkul Yojana :प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण लाभार्थ्यांची गावाची यादी कशी बघायची ?

  • घरकुल योजनाची यादी बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल मध्ये सर्च करायचं आहे pmayg.nic.in
  • त्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या ओफिशियाल वेबसाईट वर जाल
  • तिथे तुम्हाला Awaassoft या पर्यायाची निवड करायची आहे
  • निवड केल्यानंतर रिपोर्ट Report हा पर्याय निवडा.
  • तिथे तुम्हाला A,B,C,D,E,F,G,H, असे पर्याय दिसतील त्यातील H पर्याय म्हणजेच सोशल ऑडीट रिपोर्ट Social Audit Reports हा पर्याय निवडा
  • सोशल ऑडीट रिपोर्ट च्या खालील बाजूला बेनिफिशारी डीटेल्स वेरीफिकेषण हा पर्याय निवडा
  • हा पर्याय निवडल्या नंतर तुम्ही Salection Filters सालेक्षण फिल्टर या पर्यावावर जा
  • आता तुमचे राज्य त्यानंतर जिल्हा तालुका गाव निवड करा
  • नंतर तुम्हाला घरकुल योजनेच्या अधिक पर्याय दिसतील उदा. रमाई आवास योजना,(Ramai Awas Yojana,) प्रधानमंत्री आवास योजना,( Prdhanmantri Awas Yojana )शबरी घरकुल योजना ( Shabari Awas Yojana )
  • त्यातील योग्य पर्याय निवडून खालील उत्तर द्या
  • आणि तुमच्या समोर तुमच्या गावाची घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी दिसेल.
  • इथे तुमची निवड कोणत्या योजनेतून झाली आहे तसेच तुम्हाला घरकुल योजनेचे किती टप्पे मिळाले याची सुद्धा संपूर्ण माहिती मिळेल.
तर मित्रानो अशा करतो तुम्हाला माहिती आवडली असेल पुन्हा भेटूया एक नव्या लेखात.

अजून काही नवीन योजना बघा.




















Post a Comment

0 Comments